तुझ्या स्पर्शाचे चांदणे

तुझ्या स्पर्शाचे चांदणे, कुशीत माझ्या जपतो मी 
तुझ्या स्पर्शाने बावरलो, स्वप्नी तुझ्याच मोहरलो मी

पाहिले जेव्हा तुला मी, थबकलो वाटेत मी
हुंगला तो गंध बावरा, स्पर्शुनी जाईस मी 
थांबवू शकलो मना ना गुंतलो अवघा तुझ्या मी
तुझ्या स्पर्शाचे चांदणे...

मनात माझ्या तुझी साठवण, नयनी माझ्या तुझेच दर्पण
क्षणाक्षणाला तुझी आठवण, आठवणीतून तुझीच गुंफण
आठवणी नभात उत्कट प्रीतं साजरी करतो मी
तुझ्या स्पर्शाचे चांदणे...

त्या ओठांचे स्मित जागवी, तुज भेटीचे अधिरं झरे 
त्या धारांचे तुषार भिजवी, तुझं कांतीचे रूप लाजरे
सुंदरतेचा अर्थ जाणलं लाजऱ्या स्पर्शात मी
तुझ्या स्पर्शाचे चांदणे...




Comments