Posts

मनो-अभिराम तयाचे नाव

जागृत होती आज जाणिवा शुद्ध हेतूचा ओतून भाव । अर्थ जगूया आज नेमका मनो-अभिराम तयाचे नाव ।। सत्याची सांगड स्वप्नांशी, अन् क्षमतेची आव्हानांशी गुणाकार त्या आव्हानांचा, स्वप्नांचाही होतो भार दिवसामागून दिवस लोटती, अपुरे पडता आव्हानांशी वाहत जावे कुठवर ओझे, विस्कटता नाते स्वप्नांशी प्रश्नांना सुलभे ना उत्तर, नशिबाचा वाटे दुष्काळ निदान जात्याच चुकता होते प्रयत्ननिष्ठेची आबाळ नको विलंबू अजून रे मना, आत्मचिंतना दे अवकाश अनन्यतेची साक्ष तू तुझ्या अस्तित्वाला दे आकार अविष्कार तू स्वतंत्रतेचा , परतंत्राचा कर पाडाव  जागृत होती आज जाणिवा शुद्ध हेतूचा ओतून भाव । अर्थ जगूया आज नेमका मनो-अभिराम तयाचे नाव ।।                                                                              - वैभव शुक्ल     

उजळू दे माझी पहाट

साधावया काट्यामधुनी रेश्मी हिरवा प्रवास   उंबरा ओलांडला मी उजळू दे माझी पहाट  दोष हा नव्हता कुणाचा बिथरलो माझाच मी उंबऱ्या वेशीत अडलो खुंटलो माझाच मी हरवले स्वारस्य माझे मृगजली ठरताच वाट उंबरा ओलांडला मी उजळू दे माझी पहाट दुःख माझे सावरू दे, सौख्य माझे आठवू दे यातनामय भावनांचे यातनापण विरघळू दे दाटलेल्या भावनांचा आज होई गडगडाट उंबरा ओलांडला मी, उजळू दे माझी पहाट स्वप्न माझे पाझरू दे, यत्न माझे झरझरू दे नीतीच्या सौहार्दतेचे रंग सारे त्या मिळू दे ओंजळीचे स्वप्न माझ्या, क्षितिज सुंदर पायवाट उंबरा ओलांडला मी, उजळू दे माझी पहाट

तुझ्या स्पर्शाचे चांदणे

तुझ्या स्पर्शाचे चांदणे, कुशीत माझ्या जपतो मी  तुझ्या स्पर्शाने बावरलो, स्वप्नी तुझ्याच मोहरलो मी पाहिले जेव्हा तुला मी, थबकलो वाटेत मी हुंगला तो गंध बावरा, स्पर्शुनी जाईस मी  थांबवू शकलो मना ना गुंतलो अवघा तुझ्या मी तुझ्या स्पर्शाचे चांदणे... मनात माझ्या तुझी साठवण, नयनी माझ्या तुझेच दर्पण क्षणाक्षणाला तुझी आठवण, आठवणीतून तुझीच गुंफण आठवणी नभात उत्कट प्रीतं साजरी करतो मी तुझ्या स्पर्शाचे चांदणे... त्या ओठांचे स्मित जागवी, तुज भेटीचे अधिरं झरे  त्या धारांचे तुषार भिजवी, तुझं कांतीचे रूप लाजरे सुंदरतेचा अर्थ जाणलं लाजऱ्या स्पर्शात मी तुझ्या स्पर्शाचे चांदणे... Content Copyright© 2020 by vaibhav. All rights reserved.